विज्ञान in Yasni Exposé of Marathi Vidnyan Parishad Pune Vibhag

Visitors
(202 since 09.02.2013)

Person-Info

337

Marathi Vidnyan Parishad, Pune Vibhag, Voluntary Organization @ Marathi Vidnyan Parishad, Pune

Nickname: mavipa, Country: India, Language: English
anonym

1 result about Marathi Vidnyan Parishad, Pune Vibhag

Vidnyan Ranjan Spardha 2013 विज्ञान रंजन स्पर्धा २०१३ Open book test on Science in day to day life.

  विज्ञान रंजन स्पर्धा २०१३ - नियमावली *ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. *प्रवेशमूल्य नाही. * खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनाने, कोणालाही विचारून, पुस्तकात पाहून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील. * जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या हस्ताक्षरात फुलस्केप कागदावर लिहून १५ फेब्रुवारी २०१३ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४१११०३०. * उत्तम प्रयत्नांना आकर्षक बक्षिसे. * २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनी प्राथमिक विजेत्यांची नावे महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे ३० येथील संध्याकाळच्या कार्यक्रमात जाहीर केली जातील. * शिक्षण आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना पुढील प्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील. शिक्षण: पाचवीपर्यंत(१०), सातवीपर्यंत(९), दहावीपर्यंत(७), बारावीपर्यंत(५), पदवी(३) शास्त्रशाखा(०). वय वर्षे: १३ पर्यंत(६), १४ ते १६(४), १७ ते २०(२), ४१ ते ६०(२), ६१ ते ८०(४), ८१ हून जास्त (६) * आपल्या उत्तरपत्रिकेसोबत स्वतंत्र कागदावर पुढील माहिती लिहून पाठवावी- १. संपूर्ण नाव, २. पत्ता, ३. दूरध्वनी, ४. ई-मेल, ५. जन्मतारीख, ६. शिक्षण, ७. व्यवसाय, ८. पुढावा गुण. * प्राथमिक विजेत्यांची अंतिम फेरी ९ मार्च २०१३ रोजी पुणे येथे होईल. uपरीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. u अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर संपर्क करावा - संजय मा. क. (९९२२५५२०४६), विनय र. र., (९४२२०४८९६७), किंवा ई-मेल mavipa.pune@gmail.com,. प्रश्नावली प्र. १ निरीक्षण करून उत्तरे लिहा . (गुण १० ) 1. स्टेपलरच्या पिनेची लांबी किती असते? 2. लोहचुंबकाला न चिकटणारी भारतीय नाणी कोणती? 3. कंपासपेटीतील त्रिकोणी गुण्यांमध्ये किती अंशांचे कोन असतात? 4. “चिचुंद्रीने चहाचा चमचा चक्क चाटला” यात कोणकोणत्या ‘च’चे उच्चार एकसारखे होतात? 5. गाईच्या एक लीटर दुधाचे वजन किती? 6. मोहोरीच्या दाण्याच्या रंगासारखाच रंग असणारी खाद्य वस्तू कोणती? 7. गरम तव्यावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाचा आकार कसा दिसतो? 8. सोबतच्या आकृतीत (जन्मकुंडली) कोणकोणते आणि किती भौमितिक आकार दिसतात? 9. तुमच्या दोन्ही पावलांच्या बाह्याकृती काढून त्यांच्यात दिसणारे फरक लिहा. 10. आयत आणि त्रिकोण या मिश्र आकारात विणलेली घरगुती वस्तू कोणती? प्र. २ चूक की बरोबर ते लिहा (गुण १० ) (चुकीचे असेल ते दुरुस्त करून लिहा) 1. जास्वंदीचे फळ गोलाकार असते. 2. ढग दाटून आले असता विजा गरजल्या की पाऊस पडत नाही. 3. जैतापूर व कुडनकुलम येथे वीजनिर्मितीसाठी धरणे होत आहेत. 4. आपण शंभर दिवसात आपल्या वजनाइतके अन्न खातो. 5. रेल्वेप्रवासी मलमूत्रविसर्जन उघड्यावर करतात. 6. विमानातील संडाससफाईसाठी हवेच्या झोताचा वापर होतो. 7. सोमनाथ मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंत कोठेही जमिनीवर पाऊस पडत नाही. 8. म्हातारपणी श्रवणशक्ती कमी झाली की स्मरणशक्ती कमी होते. 9. ध्रुवीय प्रदेशात कधी कधी रात्री आभाळात रंगीबेरंगी उजेड पडतो. 10. अन्न शिजवून खायला लागल्यानंतर माणूस बुद्धिमान झाला. प्र. ३ खालील विधानांमधील ‘मी’ कोण ते लिहा (गुण १० ) 1. मी स्वत: जळत नाही पण माझ्याशिवाय कोणी जळू शकत नाही. 2. मी माझ्या आयुष्यात एकदाच डंख मारू शकते. 3. एकट्या मला काही किंमत नाही पण माझ्या डावीकडे कोणी असले की आमची किंमत वाढते. 4. माझे घनरूप माझ्या द्रवरुपापेक्षा हलके असते. 5. मी एक पाहुणा २८ नोव्हेंबर १३ ला सूर्याच्या सर्वात जवळ असेन. 6. तुम्हाला वाटते मी घड्याळात दिसेन, घड्याळात ‘मी’ नाही दिसत ‘ती’ दिसते. 7. मुद्दाम जखम करून त्यात रोगजंतू भरून रोग टाळण्याची कल्पना माझीच. 8. माझ्या बरोबरीच्या चौघांना माझ्याइतके वळता येत नाही. 9. आम्हा पाचांपैकी चार जवळजवळ असतात मी मात्र शरीरभर असते.  10. तुम्ही झोपलात की मी तुमच्या पापण्यांवरच्या मृतपेशींची विल्हेवाट लावते. प्र. ४ शास्त्रीय कारणे द्या (गुण २०) 1. एका व्यक्तीला जांभई देताना पाहणाऱ्या व्यक्तीला जांभई येते. 2. साखरपाण्याने कागदावर लिहिले की वाळल्यावर दिसेनासे होते पण कागद गरम केल्यावर दिसू लागते. 3. सीडीवरून परावर्तीत होणारा प्रकाश सप्तरंगी दिसतो. 4. भाजल्यावर फुलका फुगतो पण पापडाला पुटकुळ्या येतात. 5. अष्टमीची भरती पौर्णिमेच्या भरतीपेक्षा कमी असते. 6. तीन टोके असणाऱ्या विजेच्या पिनचे वरचे टोक मोठे असते. 7. पाल न पडता छताखाली चिकटून चालू शकते. 8. थर्मास फ्लास्क मधील काच पारदर्शक नसते. 9. औषध फवारणी केल्यानंतर झुरळे पालथी पडून मरतात. 10. वादळी हवामानात इंटरनेट वापरू नये. प्र. ५ प्रश्न एक उत्तरे अनेक. (गुण १५) पुढील प्रश्नांना दिलेल्या उत्तरांपैकी कोणती उत्तरे बरोबर ठरतील ते स्पष्ट करा. १. पारा या पदार्थाचे भौतिक रूप कसे असते? क- द्रव ख- बाष्प ग- स्थायू घ- वायू २. एक चादर वाळायला ३ तास तर तशाच ८ चादरी वाळायला किती तास? क- ३ ख- ६ ग- १२ घ- २४ ३. १ लीटर पाण्यात २०० ग्रॅम मीठ टाकले असता---? क- पाण्याची पातळी वाढते. ख- पाणी जड होते. ग- पाणी खारट होते. घ- पाणी गार होते. ४. या मूलद्रव्याचे नाव कोणत्या देशाच्या नावावरून पडले? क- इंडीयम ख- अमेरिकीयम  ग- फ्रान्सियम घ- पोलोनियम ५. एका व्यक्तीने पळायला सुरुवात करताना हातावरील घड्याळात बघितले तेव्हा ९ वाजले होते. व्यक्तीने पळणे थांबविले तेव्हा घड्याळाच्या २ काट्यांमध्ये तेवढाच कोन होता तर ती व्यक्ती किती वेळ पळत होती? क- ३ सेकंद ख- ३३ मिनिटे  ग- ६५ मिनिटे घ- २ तास १२ मिनिटे प्र. ६ थोडक्यात उत्तरे लिहा. (गुण १०) 1. १ जानेवारीला अंगारकी चतुर्थी असली तर त्यावर्षी १ मार्चला कोणता वार असेल? 2. २ डोळ्यांचा सर्वात मोठा फायदा कोणता? 3. मंगळावरील चॅलेंजर यानात कोणती ऊर्जा वापरली जाते? 4. अणुपेक्षा लहान पाच कणांची नावे लिहा. 5. मेगा, गिगा, झिटा या संख्यांची मराठी नावे लिहा. 6. तलावातील पाणीसाठा मोजण्याचे परिमाण कोणते? 7. कोणत्या वृक्षाच्या बिया झाडावरच रुजतात? 8. केसांचा काळा रंग कोणत्या रसायनामुळे असतो? 9. वेल्क्रोचा शोध कोणी आणि कोणत्या वनस्पतीच्या आधारे लावला? 10. बेरीज १०० येईल आणि ० ते ९ सर्व अंक वापरले जातील असे दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहा. प्र. ७ करून पहा, निरीक्षणे नोंदवा, निष्कर्ष लिहा (गुण २०) २२  १२  १८  ८७ ८८  १७   ९  २५ १०  २४  ८९  १६ १९  ८६  २३  ११ 1. सोबतच्या जादुई चौरसात थोर गणिती श्रीनिवास रामानुजन यांची जन्मतारीख शोधा. त्याजागी तुमची जन्मतारीख लिहा. उरलेले अंक बदलून नवा जादुई चौरस तयार करा. 2. एक पंचकोनी चांदणी हात न उचलता काढा. शिरोबिंदू त, थ, द, ध, न अशी नावे द्या. पंचकोनाला य, र, ल, व, श नाव द्या. या आकृतीत किती कोन दिसतात? कोणत्याही दोन कोनांची सर्व नावे लिहा. 3. आपल्याला दोन नाकपुड्या आहेत. श्वसन करताना या दोन्हीचा वापर समप्रमाणात होतो का? हे तपासून पाहण्यासाठी चार दिवसात वेगवेगळ्या वेळी प्रयोग करा. त्याची रचना, निरीक्षणे आणि निष्कर्ष लिहा. 4. दोन वेगळ्या धातूंच्या वस्तू (उदा.चमचा, पळी, अंगठी, ताटली इ.) घ्या. त्यांना वीजवाहक तारांचे एक-एक टोक जोडा, दुसरे टोक एका एलईडी दिव्याला किंवा वीजमापकाला जोडा. दोन्ही वस्तूत अंतर ठेवून त्या पाण्यात बुडवा. वीज वाहते का? पाण्याऐवजी मीठ, साखर, सोडा, फिनाईल, लिंबूरस यांचे द्रावण वापरून प्रयोग करा. काय आढळते ते लिहा. 5. आपल्या माहितीच्या किमान २५ मृत व्यक्तींच्या जन्म व मृत्यूच्या तारखा वारासह एका कोष्टकात लिहा. दोन्ही गोष्टी समान तारखेला, समान महिन्यात, समान वाराला झाल्याचे प्रमाण तपासा, निष्कर्ष लिहा. प्र. ८ विस्ताराने उत्तर लिहा (गुण २०) मुळाक्षरे, शब्द, वाक्य, अलंकार हे भाषेचे घटक असतात तसे गणिताचे घटक कोणते?अंकगणित, बीजगणित असे गणिताचे प्रकार कोणते? शिवणकाम, स्वयंपाक, रंगकाम, चित्रकला, औषधोपचार, व्यापार, साफसफाई, वास्तूआरेखन, जैववैज्ञानिक संशोधन, आकाशनिरीक्षण करणाऱ्या व्यक्तींना कोणकोणत्या प्रकारच्या गणिताची गरज कशी आणि कधी पडते? प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या हस्ताक्षरात फुलस्केप कागदावर लिहून १५ फेब्रुवारी २०१३ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४१११०३०. या प्रश्नपत्रिकेच्या अनेक प्रती काढून इतरांनाही विज्ञान रंजन स्पर्धेत भाग घ्यायला प्रोत्साहन द्या.
1x
yasni 2013-02-09  +  

Rate now

(0)
 0 Ratings 
5 Stars (0)
4 Stars (0)
3 Stars (0)
2 Stars (0)
1 Star (0)

Your connection to Marathi Vidnyan Parishad, Pune Vibhag

Me
Me
Marathi Vidnyan Parishad, Pune Vibhag @ Marathi Vidnyan Parishad, Pune
Marathi...

You don't have an Exposé on Yasni yet.

Contacts of Marathi Vidnyan Parishad Pune (0)

No entries.

Relevant keywords for Marathi Vidnyan Parishad Pune

Important people: Today - Overview / Names: Today - Overview
+1